खस्ता

  • शिळ्या किंवा सकाळच्या पोळ्या ३-४, कांदा बारीक चिरून,
  • कोथिंबीर बारीक चिरून, बारीक शेव - १ वाटी
  • तिखट, मीठ, चाट मसाला, हिरवी पुदिना चटणी, चिंच खजूराची गोड आंबट चटणी
  • तळण्यासाठी तेल
३० मिनिटे
३ जण

पोळ्यांचे त्रिकोणी तुकडे करून घ्या. ते तेलात खमंग तळून घ्या. तळतेवेळी टोचे मारून कडक करा.

एका ताटलीत गोलाकार तुकडे मांडून, त्यावर कांदा, कोथिंबीर, आवडत असल्यास बारीक चिरून टोमॅटो, चटण्या, तिखट, मीठ, चाट मसाला भूरभूरावा.

आकर्षक रित्या सजवून सर्व्ह करावे.

तळलेले नको असल्यास, थोडे तेल पोळीवर ब्रश करून तव्यावर तुकडे कडक भाजून घ्यावेत.

माझे बाबा