पालक देठांचे रायते

  • पालक निवडल्यावर खाली राहणारी (फार जाड घेऊ नयेत) देठे
  • दही, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य
१५ मिनिटे
३ जण

पालकाची सरळ, लांब देठे निवडून नीट धुवून घ्यावीत. त्याचे १/२ इंच लांबीचे तुकडे करून वाफवून घ्यावेत.

थंड झाल्यावर त्यात दही, मीठ, साखर नीट कालवून वरून मोहोरी हिंगाची फोडणी घालावी.

पालक देठे पोष्टिक असल्याने वाया जात नाहीत. चवही सुरेख लागते.

आमच्या पोळ्यांच्या बाई