बुंदी रायते

  • १ वाटि दहि
  • १ वाटि खारि बुंदि
  • १ छोटा कांदा चिरुन
  • २ चमचे कोथिंबिर
  • १ चमचा चिरलेले आले
  • २ चमचे साखर
  • पाव चमचा काळे मिठ
  • चवि नुसार साधे मिठ
  • पाव चमचा लाल तिखट
१५ मिनिटे
५ जणांसाठी

प्रथम दह्यात थोडे पाणि टाकुन जरा घट्ट्च घुसळुन घ्यावे. मग त्यात काळे मिठ, साधे मिठ, साखर, लाल तिखट टाकुन हलवावे. नंतर राहिलेले सर्व जिन्नस टाकावे. जर बुंदि कडक आवडत असेल तर ति आयत्या वेळेवर टाकायचि. खुपच छान लागते.

पराठा, पुलाव सोबत अधिक छान लागते.

हॉटेलमध्ये साधेच खाल्ले होते. त्यात काळे मिठ, तिखट, कांदा कोथिंबीर स्वतः टाकुन पाहीले.