हास्यतुकडे

स्वगत म्हणजे मनातल्या मनात

विवाहाची निमंत्रण पत्रिका आल्यावर आपण हळुच "अहेर आणू नये" हे वाक्य बघतो बघतो व सर्वांनी फुकट जेवण हादडायला जायचं असं मनात ठरवतो, तश्यागत.

ऐकणारा समोरच्याचे खोटेच कौतुक करत असतो. पण मनातल्या मनात काय म्हणतो ते पुढे पाहाच.

बोलणारा (उघड): (आनंदाने) साहेब पेढे घ्या. ८ वर्षांनी पोर झालं. मुलगा झाला साहेब.

ऐकणारा (मनात): (मग एवढी वर्षे काय करत होतास?)

 बोलणारा (उघड):  साहेब ही माझी पत्नी सोनाली.

ऐकणारा (मनात):  (मग एवढे दिवस तुझ्याबरोबर फिरत होती ती कोण?)

बोलणारा (उघड):  साहेब मुलगा १०वी च्या बोर्डात पाचवा आला.

ऐकणारा (मनात):  (तो शेवटी का येईना मला काय करायचे आहे?)

बोलणारा (उघड):  विवाहाचे निमंत्रण द्यायला आलोय. सरोजशी लग्न ठरलंय.

ऐकणारा (मनात):  (च्यायला, एवढे दिवस तर ती दिन्या बरोबर फिरत होती.)

बोलणारा (उघड):  साहेब बढती मिळाली. उद्या पार्टी ठेवली आहे.

ऐकणारा (मनात):  (एवढी वर्षे चमचेगिरी केली त्याचा फायदा झाला म्हणायचा.)

बोलणारा (उघड):  ही माझी बायको, पल्लवी.

ऐकणारा (मनात):  (या माकडाला मस्त चिकणी बायको मिळाली, मज्जा आहे साल्याची.)

बोलणारा (उघड):  हे फोटोंचे अल्बम्स पाहत बसा.

ऐकणारा (मनात):  (आग लाव त्या अल्बम्सना, वैताग साला.)