हास्यतुकडे-२

बोलणारा (उघड): साहेब आपल्या रेश्मा मॅडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता.

ऐकणारा (मनात): (कशी येणार? काल संध्याकळीच तर तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॅंड पकडले होते.)

बोलणारा (उघड): साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऑफिसमध्ये का आल्या होत्या?

ऐकणारा (मनात): (तुला कशाला पाहिजेत नसत्या चांभारचौकशा?)

बोलणारा (उघड): साहेब देवाच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला.

ऐकणारा (मनात): (मग काय गावभर पेढे वाटू?)

बोलणारा (उघड): साहेब आज मी नवीन मोटरसायकल विकत घेतली.

ऐकणारा (मनात): (बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?)

बोलणारा (उघड): साहेब ५ वर्षे झाली. आता तरी माझे प्रमोशन करा की.

ऐकणारा (मनात): (लेका तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे. ती तुला कशी देऊ?)