विदर्भातील निवडक राष्ट्रीय उद्याने - १

पेंच नॅशनल पार्क

२५७ कि.मी क्षेत्रफळ असलेले सातपुडा पर्वत रांगांत वसलेले हे भारताचं २५ वे नॅशनल पार्क व टायगर रिझर्व आहे.पेंच नदीवरून ह्या पार्कला पेंच नॅशनल पार्क हे नाव पडले आहे. पर्वत रांगा व दर्‍याखोर्‍यांत वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण आहे. ज्याचा उल्लेख आपल्याला कालिदासांच्या मेघदूत व शाकुंतल मध्ये आढळतो.

इथे ३३ प्रकारचे सस्तन प्राणी,१६४ प्रकारचे पक्षी,५० प्रकारचे  मासे,१० प्रकारचे भू-जलचर प्राणी व ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी आढळतात. अधिकृतपणे हे वन वाघ, चित्त्ता,बिबट्या यांकरिता आरक्षित आहे. इथे सांबर,चितळ,हरीण्,नीलगाय,भालू,माकडे,वानरे,कोल्हे व जंगली कुत्रे भरपूर प्रमाणात आहेत त्याच बरोबर स्थलांतरित पक्षी मोठ्या संखेने येतात.

एकाच ठिकाणी चार वेगवेगळ्या प्रकारचे जंगल पाहायला मिळणारं हे अदभुत ठिकाण आहे. इथे प्रामुख्याने सागवानाची झाडे आढळतात.

इथला ऐतिहासिक शैलवंशीय नगरधन किल्ला तर बघावाच आणि नेचर इंटरप्रिटेशन सेंटरला भेट देऊन प्रतिध्वनीचा आनंद जरुर घ्यावा.

नागपूर पासूनचे अंतर ८० कि. मी.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्ट मध्ये राहण्याची उत्तम सोय आहे.

फोन नं. ०७१२-२२५३३२५