विदर्भातील निवडक राष्ट्रीय उद्याने-२

नागझिरा वाईल्ड लाईफ सॅन्चूरी

हे छोटेसे आरक्षित वन मूलच्या सम्बाईपूर व भोडोबरी आरक्षित वनाचा छोटासा भाग आहे. सातपुडा पर्वत रांगांच्या टोकाशी गाईसुरी डोंगरात सागाच्या वनात लपलेलं सुंदर पर्यटनस्थळ आहे. सागवान बरोबर बांबू ,येन, बिजासाआरखे वृक्ष व वनौषधी मोठ्या प्रमाणात आढळतात. ह्या दाट वनात वेगवेगळे पक्षी साद देत असतात. नीलगायी दबक्या पावलांनी आपल्याला सोबत करतात आणि माकडं वाघ आल्याची वर्दी देऊन आपल्याला सावध करतात. डौलाने उड्या मारणारी हरणं पाहणं हा अद्भुत अनुभव इथे येतो.

           इथे १६७ प्रकारचे पक्षी, ३४ प्रकाराचे सस्तन प्राणी व ५० प्रकारची फुलपाखरे आहेत्.वाघ, बिबटे, जंगली कुत्रे, सांबर चितळ, नीलगाय, चौसिंगा इथे आढलतात. देशीविदेशी पक्षीही बघायला मिळतात. वीज, दूरदर्शन, दूरध्वनी यांच्या व्यत्ययाशिवाय निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा एकदा तरी जरुर अनुभव घ्यावा. हा अनुभव घेण्यासाठी नोव्हेंबर ते जून हा उत्तम काळ आहे. नागपुरापासूनचे अंतर १२४ कि. मि. गोंदियापासून ४४कि. मि.