वृत्त सर्वेक्षण

     चित्रपटतारे, क्रिकेटपटू, नेते, बिझनेसमन व जोडीला दंगली, आंदोलने यांची वृत्ते वाहिन्यांवर खूप प्रमाणात दाखविली जातात. समाजात काही व्यक्ती व संस्था खूप मोठ्या प्रमाणावर उपयुक्त कार्य करीत असतात. त्यांच्याशी संबंधित वृत्ते कमी प्रमाणात असतात. उदाहरणार्थ, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर, विचारवंत आ.ह.साळुंखे, राजस्थानमध्ये पाणीप्रश्नी मोलाचे कार्य करणारे राजेंद्रसिंह, प्रतिकूल परिस्थितीत विहीर खोदणारे पती-पत्नी आदी. 
     याबाबत एखाद्या संस्थेने किती प्रमाणात वृत्ते इतर आणि किती प्रमाणात वृत्ते चित्रपट, क्रीडा व राजकारणविषयक आहेत, याबाबत सर्वेक्षण केले आहे का ?
    तज्ज्ञ मनोगतींनी माहिती द्यावी, मते व्यक्त करावीत.