कडधान्याची भेळ

  • एक वाटी मिक्स कडधान्ये
  • (मुग,मटकी,चवळी,वाटाणे,अजुन जी तुम्हाला आवडतील ती)
  • बारिक चिरलेला कान्दा, टोम्याटो, कोथिम्बिर,
  • लिम्बाचा रस किन्वा बारीक चिरलेली कैरी,
  • लाल तिखट, धनेजीरे पूड, मीठ, हळद,तेल,मोहोरी,गोडा मसाला
  • फरसाण,बारीक शेव, शेन्गदाणे
३० मिनिटे
२-३ जण

१. एक वाटी मिक्स कडधान्ये १०-१२ तास भिजत थेवावी, फडक्यात बांधून त्याला मोड आणावेत.
२. तेल गरम करायला थेवावे, मोहोरी टाकून तडतडू द्यावी.
३. त्यात शेन्गदाणे टाकून तळून घ्यावेत, ब्राउन रंगाचे झाले कि त्यात मोड आलेली कडधान्ये टाकावीत.
४. मग त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, मीठ, हळद,गोडा मसाला चवीनुसार टाकावेत.
५. छान मिक्स करून परतायला थेवावे. त्यावर झाकण थेवू नये, तेलावरच फ्राय होवू द्यावेत.
६. मस्त परतून झाले कि डिश मध्ये घेवून त्यावर बारिक चिरलेला कान्दा, टोम्याटो, कोथिम्बिर तसेच
    लिम्बाचा रस किन्वा बारीक चिरलेली कैरी घालावी.
७. वरून फरसाण किन्वा बारीक शेव टाकावी.

भेळ खायला तयार आहे !!!!

गोड चव आवडत असल्यास साखर घालावी.

आई कडुन