बीटाविकि काय आहे?

आता तुम्ही मिडीयाविकि मुक्त संगणक प्रणाली विकि पॅकेज सॉफ्टवेअर  स्वतःचे मराठीतील स्वतंत्र संकेतस्थळ घडवण्याकरितासुद्धा वापरू शकता. त्याच्या मिडीयाविकि सॉफ्टवेअरच्या (इतर भाषांत)/ भाषांतराचे काम ट्रांस्लेट विकित(बीटाविकि ) होते .मराठीकरणाचे  काम  बीटाविकित होत आले आहे. सदस्य कौस्तुभ यांनी या सॉफ्टवेअरच्या मराठीकरणात मोठा हातभार लावला आहे, तत्पूर्वी श्री अभय नातू , कोल्हापुरी व माहीतगार या सदस्यांच्या योगदानाचाही लाभ झाला.

बीटाविकि दोन उद्दिष्ट साध्य करते:

हे असे विस्तारकक्ष संकेतस्थळ आहे की जे मिडियाविकि भाषांतराकरिता तसेच त्याचे विस्तारकक्ष व इतर प्रकल्पांच्या भाषांतर व्यासपीठ पुरवते.
आणि ते चालवणार्‍या विकासकांना प्रात्यक्षिकाचे व्यासपीठ पुरवते.
हा विकि विकिमीडिया प्रकल्पांचा भाग नाही. हे संकेतस्थळ श्री.नाईक आणि श्री.सायब्रॅंड, या दोन मिडियाविकि विकासकांकडून चालवले जाते. भाषांतर सुविधा एका विस्तारकक्षाने पुरवली आहे.

मिडियाविकिची आणि त्याच्या विस्तारकक्षांची १४० हून अधिक स्थानिकीकरणे आणि त्याचे कक्षाविस्तार सध्या सोपे भाषांतरणमाध्यम तसेच समन्वय आणि भरण-पोषणाकरिता म्हणून Betawiki वापरतात.

तुम्हाला माहीत असलेल्या भाषांत भाषांतर करण्यात तुम्ही सहभागी होऊ शकता,आणि एवढेच नाहीतर एखाद्या नवीन भाषेतील भाषांतर या विकिवर सुरू करू शकता. विकिमिडिया फाउंडेशनच्या कडे विनंती केलेल्या नवीन भाषाप्रकल्पांच्या मिडियाविकि इंटरफेसचे भाषांतरणही तेथेच पार पाडले जाते.

धन्यवाद

-विकिकर