मनोगतवर गरज वाटू लागलेल्या सोयी

मनोगत वाढत आहे आणि वाढीमुळे होणाऱ्या अनेक अपरिहार्य गोष्टी इथेही घडू लागल्या आहेत. लेखनाचा दर्जा - निव्वळ जास्त मिसळीमुळे घसरू लागला आहे. सभासदांची संख्या वाढत आहे हे उत्तमच आहे, परंतु वाढलेल्या लेखसंख्येमुळे उत्तम, चांगले आणि फारसे चांगले नसलेले असे लेखन ओळखण्यास जास्त श्रम पडू लागले आहेत.

ह्यावर एक उपाय आहे तो लेखांना 'दर्जा देण्याची सोय' (rating) आणि 'लेखांवर दर्जानुसार अथवा लोकप्रियतेनुसार चाळणी लावण्याची सोय' (filtering according to rating or popularity).
दर्जा देण्याची सोय हल्ली बऱ्याच साईटसवर असते आणि ती अतिशय उपयुक्त आहे.
माझ्या मते मनोगतवर आजच्या घडीस आवश्यक असणाऱ्या सोयींत ह्या सर्वात महत्वाच्या आहेत.

काय म्हणता मंडळी ? कशी वाटते कल्पना ?