नव (गद्य) कविता

धडामधूम फटाक्यांच्या आवाजात विहिरीतून पाणी काढताना पंक्चर झालेल्या बसचे चाक बदलायला तीन तास लागले. ह्या दरम्यान एका अगडबंब हत्तिणीने एका पिल्लाला जन्म दिल्याचा खटला दिवाणी न्यायालयात न्यावा की नाही या बाबत विधानसभेत एकमत होऊ  शकले नाही. पण सचिनने त्रिशतक केल्या प्रीत्यर्थ आयोजित केलेल्या एका एकपात्री प्रयोगाच्या तेविसाव्या खेळानंतर झालेल्या सभेत मगनचंद आणि कंपनीचे संचालक श्री. अब्दुल्ला यांनी ते राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. म्हणून साधूने त्यालाही नकारार्थी उत्तर दिले. चौरस्त्याजवळच्या उपाहारगृहात तामसीपणा नसल्याने त्याला लागून असलेल्या जंगलात डुकरांचा स्वैर संचार चालू आहे. या बातम्या आकाशातून देण्यात येत आहेत...