एप्रिल २० २००८

सांगाल का ?

गाईले अधुरेच गीत मी, तिला सांगाल का
राहिलो जगास भीत, एवढे कराल का

हा भरुन आसमंत, मंद वाहतोय गंध
असेल ती कुठे इथेच, ठाव तो दावाल का

रातराणिच्या फुलांस, बहर आज येत खास
गेली कोणत्या दिशेस ती ,मला सांगाल का

जागता तिचेच भास, स्वप्नांतुन तोच ध्यास
भेटताच ती उद्यास, जाण तीस द्याल का

ह्या टिपूर चांदण्यात, जागलो पहात वाट
होतसे अता पहाट, तिज निरोप द्याल का

Post to Feed

तुज काय झाले
रात्र जागुन काढल्याने...
अधुरे...
अधुरे...
ह्या टिपूर चांदण्यात,
सहमत.
हेच
वा!
वा, सतीशराव...
छान!
धन्यवाद !

Typing help hide