एप्रिल २१ २००८

रंग...

बघताना मी झालो होतो दंग
आणि तुझाही बदलत होता रंग...

तू नसताना आठवणी असतातच!
तू नसताना तुझाच असतो संग...

उठून जाऊ नकोस अर्ध्यावरुनी
होतो आहे मैफलिचा बेरंग...

रोज लढाई हरण्यासाठी लढतो;
सुरू मरेस्तो आयुष्याची जंग...

या स्वप्नांना नेहमीच मी पुसतो-
"अर्ध्यावरती का होता हो भंग?"...

तुझी प्रतीक्षा जणू परीक्षा असते;
यशात असते नशिबाचेही अंग!...

मनात असतो खोल डोह लपलेला
'अजब' तयातच उठती विविध-तरंग...

Post to Feed

अजबराव,
आणि तुझाही बदलत होता रंग...
सुंदर...
वा
हेच
छान!
गझल
तू नसताना...

Typing help hide