संवाद

काही बोधपर व मनोरंजक संवाद

(भटो भटो, कुठे गेला होता, काय आणले , फणस, कापा की बरका,  वगैरे चिरपरिचित बडबडीवर आधारित.)

: - भटो भटो
: - ओ
: - कुठे गेला होता ?
: - प्रवेश घ्यायला
: - मिळाला ?
: - नाही.
: - का ?
: - कोटा आडवा आला
: - बरं झालं, आम्ही खातो गरे, तुम्ही खा आठळ्या!
: - आठळ्याही तुम्हीच खा, मी जातो 'तिकडे'.

: - भटो भटो
: - ओ
: - कधी आला ?
: - परवाच
: - काय आणलं ?
: - चॉकलेटं
: - उभी कापू का आडवी ?
: - नका कापू, तुमच्यासाठीच आणलीयेत.
: - मजा आहे ना तिकडे ?
: - मजा नाहीये, पण सजा पण नाही.

: - भटो भटो
: - ओ
: - कुठे गेला होता ?
: - 'तिकडे', मुलाकडे.
: - काय केलेत तिकडे ?
: - नेहेमीचेच, आराम केला, फिरलो, मुलं सांभाळली.
: - मग पुढे काय ?
: - त्यांत काय ? सहा महिने इकडे, सहा महिने तिकडे!
: - मजा आहे बुवा
: - मजा कसली ? सजा आहे सजा!