सावली...

मी स्वतःच्याच सावलीला घाबरतो

जेंव्हा मी माझा न ऊरतो..

सावली माझ्या शरीराची

पण प्रतिबिंब मात्र माझ्या आत्म्याचे..

सावलीस नाही अश्रू ,सावलीस नाही दुःख

शरीर झेलतो सारे आणि सावलीस देतो सुख..

सावलीही रडते शरीराच्या यातना बघून

जखमा असतात शरीरावर पण रक्त येते सावलीतून..

घेता निरोप जगाचा सावली घेते शरीरास कवेत

जणू स्वप्न भोवते मनास सर्व निर्जीवांच्या साखरझोपेत..

गिरीश...