पालक पुलाव

  • पालक जुडी
  • कांदे -२
  • आले लसूण हिरवी मिरची पेस्ट गरम मसाला
  • जीरे मोहोरी हिंग लवंगा मीरे मीठ
  • तळलेले काजू
  • भिजवलेला बासमती तांदुळ
४५ मिनिटे
३-४

१) तांदुळ साधारण ३० मिनिट भिजत ठेवा .
2) पालकाची पाने ४-५ मिनिट परतवुन घ्या.
३) मिक्स़रमधे थोडेसे पाणी घालून पालकाची पेस्ट बनवून घ्या.
४) जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करा, काजू तळुन घ्या आणि बाजूला ठेवा.
५)जीरे मोहोरी तेलात टाका , तडतडल्यावर कांदा टाकून परतावा.
त्यातच आले लसून मिर्ची पेस्ट आणि हिंग, मीरे लवंगा,गरम मसाला घालावा .
६) भिजवलेला तांदुळ साधारण ५-६ min परतून घ्यावा। असे केल्याने भात मोकळा होतो.
७) शेवटी पालक पेस्ट अणि मीठ टाकावे.
८) अंदाजे पाणी टाकून शिजू द्यावे .
९) भात शिजल्यावर कोथम्बीर व ओला नारळ पेरावा .
१०) तललेले काजू वापरून सजवावा.

दुवा क्र. १

सुकी लाल मिरची फ़ोडणीत घातल्यास अधिक उठावदार दिसेल. हा पुलाव दह्याबरोबर चांगला लागतो.

आई