एप्रिल ३० २००८

शरपंजर

बाजाराचा ओसरला भर
उजाडले, पदराला सावर

काठ्यांच्या गर्दीत विसरता
गोवर्धन "त्या" करंगळीवर

नीळकंठ व्हा पुन्हा शंकरा
मासे तडफडती काठावर

का प्रश्नांना नसते उत्तर?
पुन्हा प्रश्न, मी पुन्हा निरुत्तर!

हाय सुखांचे हे शरपंजर
लढणे सरले, उरली घरघर...

अ प्र ति म...
काठ्यांच्या गर्दीत...
गोवर्धन उचलायला
धन्यवाद
का प्रश्नांना नसते उत्तर?
मस्त
लढणे सरले....
वा व्वा!!
आवडली गझल
छान...

Typing help hide