मे २००८

पौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू

पौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू

पौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू ।
असशी जी कुणीही, शपथ, अनुपमेय तू ॥ धृ ॥

हे केस खांद्यावरती, जणू दाटलेले ढग ।
डोळे जणू की सोमरसे भारले चषक ।
मस्ती आहे ज्यात प्रेमाची, आहेस ते मद्य तू ॥ १ ॥

चेहरा जणू की फुललेले पद्मच सरोवरी ।
की जीवनाच्या संगीती कविता खरीखुरी ।
प्रिये बहार तू, कुणा कवीचे स्वप्न तू ॥ २ ॥

ओठांवर उजळती जणू स्मित फुलझड्या ।
मार्गी तुझ्या उजळती विश्वदीप हे दिशा  ।
दुनियेतील सुंदरता आणि प्रीतीचे यौवन तू ॥ ३ ॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०५०३

हा शब्दशः केलेला अनुवाद नाही.
मात्र मूळ हिंदी गाण्याची आठवण अवश्य करून देईल.
आठवा आणि ओळखा बरे ते सदा बहार गीत. मग हवे तर पौर्णिमेला म्हणा वा एक दिवस आधी.

Post to Feed

उत्तरः
चौदहवी का चांद हो
पौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू...
लाजवाब हो !
सोप्पंय!!!
सोप्पंय!!!
चौदहवी का चांद हो..
नक्किच हे.....
उत्तर
चौदहवी का चांद हो या आफताब हो.
एक अभिप्राय
पौर्णिमेचा चंद्र वा सुर्यच जणू की तू
चौदहवी का चांद हो
गुरुदत्त चा सिनेमा ना?
सोप्पे आहे
हे गीत
उत्तर
सोप्प आहे..
चौदवीं का चांद...
व्वा छानच
ओह..छानच..
चौदहवी का चांद हो तुम...
उत्तर घोषित करावे
चौदहवी का चांद हो या आफताब हो!
गाण्याच्या अनुवादाबाबत

Typing help hide