"हो" कधी, "नाही" कधी अन् "कदाचित" ही कधी
काय समजावे कुणी ? ठाम असते ती कधी ?
रोज माझा प्रश्न अन् रोज चतुराई तिची
टाळते हसुनी कधी, मागते अवधी कधी
हा निरागस चेहरा, हास्य हे मनमोकळे
वाटते अल्लड कधी, वाटते खेळी कधी
बांध पाटाला कधी जीवनाच्या घालते
आणि होते त्यावरी कागदी होडी कधी
ती कधी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचते जाणिवांभवती कधी
ती जरी नसली तरी श्वास माझा चालतो
येत नाही त्यास पण गंध कस्तूरी कधी
अंथरावी लागते वेदना हृदयातली
चालुनी येते गझल, 'भृंग', का सहजी कधी ?
काय समजावे कुणी ? ठाम असते ती कधी ?
रोज माझा प्रश्न अन् रोज चतुराई तिची
टाळते हसुनी कधी, मागते अवधी कधी
हा निरागस चेहरा, हास्य हे मनमोकळे
वाटते अल्लड कधी, वाटते खेळी कधी
बांध पाटाला कधी जीवनाच्या घालते
आणि होते त्यावरी कागदी होडी कधी
ती कधी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचते जाणिवांभवती कधी
ती जरी नसली तरी श्वास माझा चालतो
येत नाही त्यास पण गंध कस्तूरी कधी
अंथरावी लागते वेदना हृदयातली
चालुनी येते गझल, 'भृंग', का सहजी कधी ?
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
मस्त
प्रे. सुवर्णमयी (बुध., ०७/०५/२००८ - १७:००).
अप्रतिम!
प्रे. नरेंद्र गोळे (बुध., ०७/०५/२००८ - १७:३६).
वा...वा...!
प्रे. प्रदीप कुलकर्णी (बुध., ०७/०५/२००८ - १८:०४).
वा!!
प्रे. केशवसुमार (बुध., ०७/०५/२००८ - २०:२२).
सुंदर
प्रे. चक्रधर१ (गुरु., ०८/०५/२००८ - १२:४३).
वा!
प्रे. पुलस्ति (गुरु., ०८/०५/२००८ - १३:४१).
छान
प्रे. रोहिणी (गुरु., ०८/०५/२००८ - १३:४५).
बांध पाटाला कधी..
प्रे. सतिश वाघमारे (गुरु., ०८/०५/२००८ - १८:२१).