चॉकलेट केक (कंडेन्स मिल्क)

  • मैदा २ १/४ कप, कंडेन्स मिल्क अर्धा डबा, २ मोठे चमचे पिठी साखर,
  • २ मोठे चमचे कोको पावडर, ३/४ कप तुप/लोणी, १ कप थम्स अप/कोका कोला
  • १/२ टे. स्पु. खायचा सोडा व बेकिंग पावडर प्रत्येकी, चिमुटभर मीठ
४५ मिनिटे
आवडीनुसार

मैदा, मीठ, सोडा, बेकिंग पावडर व कोको पावडर एकत्र चाळून घ्या. तूप, पिठी साखर व कंडेन्स मिल्क एकत्र फेटून घ्या. ह्या मिश्रणात थोडं-थोडं मैद्याच मिश्रण मिसळा. नंतर त्यात थम्स-अप मिसळा. थम्स अपचं प्रमाण आवश्यकतेनुसार कमी - जास्त करा. मिश्रण साधारण ओतता येईल असे असावे.मिश्रण तुप लावलेल्या भांड्यात ओता व अतिसुक्ष्मलहर भट्टीत ६०% वर किंवा ५४० डिग्रीवर १० मिनिटे भाजा. १० मिनिटे भट्टीत तसाच राहू द्या. थंड झाल्यावरच कापा म्हणजे केक व्यवस्थित कापल्या जातो.

मैदा घालून मिश्रण जास्त फेटायची गरज नसते तसेच एकाच दिशेने मिश्रण फेटावे.

स्व-प्रयोग