मे १२ २००८

मेथी-मलई -मटर

जिन्नस

  • कसूरी मेथी अर्धी वाटी, ४ मध्यम आकाराचे कांदे, मटार १ वाटी
  • काजू, मगज बी प्रत्येकी १ टेबल स्पून आणि खसखस १ चहाचा चमचा
  • साईसकट दूध १ वाटी आणि थोडी साय वेगळी
  • गरम मसाला, आले-लसूण व हिरवी मिरची वाटणाची गोळी
  • तुकडा काजू आणि खवा १ मोठा चमचा

मार्गदर्शन

प्रथम काजू, मगज बी आणि खसखस कोमट पाण्यात भिजत घाला.

मग कांद्याच्या मोठ्या फोडी करून पाण्यात घालून उकडून घ्या. कुकरमध्ये उकडले तरी चलेल.

मग या कांद्याची पेस्ट करा. मटार वाफवून घ्या.

तेल गरम करून त्यात कांद्याची पेस्ट आणि आले-लसूण वाटण घाला. पाव वाटी कसूरी मेथी घाला.

गरम मसाला घाला व परता. त्यात सायीचे दूध घाला.

काजू-मगज-खसखस वाटून घाला. वाफवलेला मटार घाला. किंचित हळद घाला.

मीठ घाला. उरलेली कसूरी मेथी घाला.

खास प्रसंग असेल तेव्हा खवा आणि काजूचे तुकडे घाला.

आपण थोडी साय वेगळी ठेवली होती......... ती छान घोटून घ्या आणि तयार झालेल्या भाजीची सजावट करा.

टीपा

साय घोटण्याऐवजी बाजारात उपलब्ध असणारे ताजे क्रीम सुद्धा वापरता येईल.

कसूरी मेथी म्हणजे वाळवलेली मेथी. ताजी मेथी मिळत नाही अशा वेळी आणि अशा

ठिकाणी तिचा छान उपयोग होतो. किराणा मालाच्या दुकानात मिळते.

माहितीचा स्रोत

माझी वहिनी - मानसी

Post to Feed
Typing help hide