कैरीचे सासम किन्वा सार

  • ३ मध्यम आकाराच्या कैर्या, २ मोठे चमचे ओले खोबरे
  • १चमचा मोहरी, १ चमचा तांदळाचे पीठ,
  • लाल तिखट, मीठ, साखर , कोथिंबीर
  • फोडणीसाठी तेल किन्वा तूप, कढिलिंब, मोहरी व हिंग
१५ मिनिटे
३-४ जणाना

प्रथम कैर्या उकडून त्यांचा गर काढावा. ओले खोबरे आणि मोहरी वाटून त्या गरात घालावी.

तांदळाचे पीठ घालावे. आवडीप्रमाणे तिखट, मीठ घालावे. साखर कैरीच्या आंबटपणानुसार घालावी.

जेवढे पातळ हवे, तेवढे पाणी घालावे. एक उकळी आल्यावर तेल किन्वा तुपाची मोहरी, हिंग व

 कढिलिंब घालून फोडणी घालावी. कोथिंबीर घालून सजवावे.

दुसरी पध्हतः- कैरीच्या गरात तांदळाचे पीठ व भरपूर गूळ घालावा. आणि फोडणीमध्ये लाल, सुक्या मिरच्या,

कढिलिंब व चमचाभर मेथीचे दाणे घालावेत. हे सार सुद्धा चविश्ट  लागते.

पारंपारिक