इडली सांबार

  • इडली : साहित्य-१ वाटी उडीद डाळ, २.५ वाट्या उकडा तांदूळ
  • मीठ, तेल, हवे असल्यास १ चमचा मेथी दाणे
  • सांबार : साहित्य-२ वाट्या तूर डाळ,२ ते ३ चमचे सांबार मसाला(मला एमटीआर सांबार पावडर आवडते),
  • १ चमचा तिखट,१ लाल सुकी मिरची,१ मध्यम कांदा,२ शेवग्याच्या शेंगा
  • १ लहान टोमॅटो,१,२ लहान वांगी,मुळा व दुधी भोपळयाच्या फोडी वाटीभर,हवा असल्यास १ लहान बटाटा
  • मीठ चवीनुसार, फोडणीचे सामान, कोथिंबिर सजावटीसाठी. १/२ लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ, थोडा गूळ(ऑप्शनल)
तीन तास
३, ४ जणांना

इडली कृती- उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घाला, ७/८ तास. मेथी दाणे उडदाच्या डाळीत टाका. नंतर ते वेगवेगळेच बारीक वाटा आणि मग एकत्र करा. नंतर त्यात चमचाभर मीठ घाला. उबदार जागी ७, ८ तास ठेवा. पीठ फुगून येईल. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवा, इडली स्टँडला तेलाचा हात लावा व त्यात पीठ घाला. साधारण १५ मिनिटे एका घाण्याला लागतात.

सांबार कृती- डाळ शिजवून घ्या. डाळीबरोबरच शेंगाही शिजवा. तेलावर खमंग फोडणी करून घ्या, त्यात लाल मिरची, कांदा घालून परता, सांबार मसाला व तिखट घालून परता. कांदा जरा गुलाबी झाला की इतर भाज्या घालून परता. शेंगा घाला. झाकण ठेवून एक वाफ आणा. चिंचेचा कोळ व डाळ घाला, पाणी घालून हवे तसे पातळ करा. उकळी आली की मीठ व हवा असल्यास गूळ घाला. खळखळून उकळू द्या. कोथिंबिर घालून सजवा. गरम गरम इडली सांबार सर्व्ह करा.

जर्मनीत 'पार बॉइल्ड राईस' म्हणून एक प्रकारचा तांदूळ मिळतो तो उकड्या तांदूळासारखाच असतो बराचसा. मी तो वापरते.

.