कलिंगडाचे सरबत

  • १ कलिंगड , मीठ, दालचिनी पूड, साखर आणि एका लिंबाचा रस
  • आईस्क्रीम चा स्कूप [ गोळे काढायचा खास चमचा]
१५ मिनिटे
कलिंगडाच्या आकारावर अवलंबून

कलिंगड कापून स्कूपने गराचे थोडेसे गोल गोळे काढून घ्यावेत. स्कूप नसेल तर चौकोनी फोडी

कापून घ्याव्यात. पण स्कूपमुळे गोल आकार छान येतो. मग बाकीचे कलिंगड चिरून घ्यावे. हा गर

मीठ, साखर, दालचिनी पूड असे सर्व मिक्सर मधून काढावे. गाळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी १ तास फ्रीज

मध्ये ठेवून थंडगार करावे. आयत्या वेळी ग्लासमध्ये सरबत आणि कलिंगडाचे ३-४ छोटे गोळे किन्वा  फोडी

घालून, सरबत सर्व्ह करावे.

स्वागत-पेय म्हणून याचा छान उपयोग होतो. लाल रंगामुळे सरबत आकर्षक दिसते.

संग्रहित