पालक सूप

  • १ जुडी पालक, १ मोठा कांदा, ५-६ लसूण पाकळ्या
  • २ चमचे तूप,२ चमचे कॉर्नफ्लोअर,मीठ आणि अर्धा कप पाणी
  • सजावटीसाठी थोडी घोटलेली साय किंवा ताजे क्रीम
३० मिनिटे
३ जणंसाठी

प्रथम पालक निवडून व धूवून घ्यावा. पाणी निथळल्यावर चिरून घ्यावा.

कांदा चिरून घ्यावा. १ चमचा तूप गरम करावं. त्यात कांदा व लसूण परतून घ्यावा.

त्यावर पालक परतून घ्यावा.मग गॅस बंद करावा. गार झाल्यावर हे मिश्रण मिक्सर मधून

 काढावे.पातळ पेस्ट तयार होईल.

मग कढईमध्ये उरलेले तूप गरम करावे. त्यात कॉर्न फ्लोअर भाजून घ्यावे.त्यात अर्धा कप

पाणी घालावे. घट्ट पेस्ट तयार होईल.त्यात पालक पेस्ट घालावी. दोन्ही एकत्र करून

व्यवस्थित ढवळावे आणि चांगली उकळी येऊ द्यावी.

वाडग्यामध्ये वाढताना  ओतल्यावर  साय किंवा क्रीम घालून सजवावे.

गरम गरम प्यावे.

स्वप्रयोग