गाजरहलवा

  • ७ते८ गाजरे, १/२ वाटी साखर
  • १०%फॅटवाले दूध १/२ते ३/४ खोका किवा आटीव दूध १ ते १. ५कप
  • १चहाचा चमचा साजूक तूप, वेलचीपूड, बदाम, पिस्ते इ. चे तुकडे
१ तास
३, ४ जणांना

साले काढूनएका गाजराचे ३ ते ४ तुकडे करा, ती उकडून घ्या. नंतर चाळणीवर घालून पाणी असलेच तर काढून टाका. पावभाजीच्या चेपणीने चांगली चेचा किवा किसा.
एका जाड बुडाच्या पातेल्यात किवा नॉन स्टीक कढईत चमचाभर साजूक तूप टाका त्यावर हा गाजराचा कीस घाला व चांगले परता, त्यात १/२ वाटीतली थोडी साखर ठेवून बाकीची साखर घाला. गोड हवे असेल तर साखर वाढवा पण गाजरालाही मुळात गोडी असल्याने साखर बेतात घालावी. पुन्हा थोडे परता.
आटीव दूध किवा १०%फॅट वाले दूध थोडे थोडे घाला आणि परता. दूध गाजरात जिरू द्या. वेलचीपूड व बदामतुकडे घाला.
गाजरे उकडून घेतलेली असल्याने शिजायला वेळ लागत नाही.

आटीव दूध हा खव्याला हा चांगला पर्याय वाटला.

.