हरबराडाळीची चटणी

  • १ वाटी चणा डाळ (हरबराडाळ)
  • ५ते ६ हिरव्या मिरच्या
  • १ पेराएवढं आलं
  • ३ते ४ लसूण पाकळ्या
  • मीठ चवीनुसार, १ चमचा तेल
  • फोडणीचे सामान
१५ मिनिटे
१ वाडगाभर चटणी होते.

डाळ ३ ते ४ तास भिजत घालणे व नंतर वाटणे.वाटताना आले,लसूण व मिरच्याही त्यात घालून भरड वाटणे.
तेलावर खमंग फोडणी करणे.कढीलिंबाची ४,५ पाने फोडणीत घालून चुरचुरीत होतील असे पहाणे. नंतर ही फोडणी भरड वाटणावर घालणे.मीठ घालणे व कालवणे.

इडली,डोसा,उत्तपा इ. प्रकारांबरोबर ही चटणी फार छान लागते.

.