जून २००८

इथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना

इथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना

पैंजणवाले जप जरा ।

लचकत, मुरडत, चाले कामिनी ।
दिपवत, चमकत, चपळ दामिनी ॥
वो बावळी, ओ सावळी, अगं ए चंचल । 
क्षणभर, थांब ना, थांब ना, थांब ना ॥

पैंजणवाले जप जरा । इथेच कुठे मन आहे ।
पायतळी येवो ना ॥ धृ ॥

जशी दामिनी ती, मेघांतून उडे ।
थोडी चाले पुढे, हलकेच वळे ॥
उचल ए, नयन तव काळे ।
पण एवढे पाहा की, कुणाची लागे हाय ना ॥ १ ॥

कुठे जाशी अशी, मदिराशी पिऊन ।
मदमस्त पवन, पदरात भरून ॥
आहे सारे, जगच मस्तीभरे ।
पाहा पण कधी, ऋतुआधी, रात काळी, येवो ना ॥ २ ॥

कधी ऐसे न हो, काही गोष्ट घडे ।
फिरकी ही माझी, तुझा नाच बने ॥
नाच ना, बनून चकोरी ।
घुंगरू कधी, स्पंदन माझे, होवोत ना ॥ ३ ॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०५१६

गाण्यातील नाचाची फिरत शब्दांमधूनही व्यवस्थित व्यक्त होते, हे मूळ हिंदी गीतकाराचे वैशिष्ट्य आहे.

ओळखा बरे हे मूळ हिंदी गीत. शीर्षकही फिरवलेलेच आहे.

Post to Feed

झकास!
मनःपूर्वक धन्यवाद.
पायलवाली देखना..
मिलिंदजी, तुमच्या अभिप्रायाचे मला अप्रुप आहे.
पायलवाली देखना
अवश्य. मला विरोपपत्ता व्यनिने कळव.
उत्तर
पायलवाली देख ना...
उत्तर घोषित करावे
उत्तरः पायलवाली देख ना, यहीं पे कहीं दिल है, पग तले आए ना

Typing help hide