रेडिओ मिरची आणि आपली मते....

आपण सर्वांनीच कधी ना कधी रेडिओ मिरची ऐकले असेल.... त्यात आर. जे नावाची/पदवीची जी व्यक्तीमत्वे काम करतात त्या बद्दल आपले काय मत आहे.....

उदा.

मी पुण्यात राहते.... तसे मी पुण्यातल्या आर. जें बद्दल माझे जे ऑब्झर्वेशन आहे ते सांगते...

१. आदिती: काही दिवसांपूर्वीपर्यंत दुपारी २ ते ५ टोटल फिल्मी या नावाचा शो करत असे... आता सकाळी ७ ते ११ हाय पुणे असा कार्यक्रम करते..... पूर्ण कार्यक्रम मराठीत करून शेवटी एक किस देते.... प्रेयसी ने प्रियकराला फोनवरून द्यावा तसा.... worried आणि पुणे ऐवजी " पूने " असा एकच अशुद्ध शब्द म्हणते..... (किंवा तेवढेच हिंदीत बोलायचा प्रयत्न असावा) म्हणजे संपूर्णपणे "मुआआह पूने" असे काहीसे..... at wits' end भयानक वाटते.....

२. आदितीः टोटल फिल्मी ह्या शो मधे.... जसे मी सांगीतले तसे सर्व मराठीत बोलुन.... टोटल फिल्मी ला "ठोटल फ़िल्मी" म्हणते(बहुदा परदेशी ऍक्सेंट मध्ये बोलायचा प्रयत्न असावा)cool उगीच!!!

३. प्रत्येक शो मध्ये जी गाणी लागतात त्यात काहीही फरक नसतो.... (सिरियल ऑर्डर शिवाय...)tongue

४‌. श्रीकांतः बंपर टु बंपर असा शो करतो.... ५ ते ९ उत्तम बडबड करतो.... रादर नॅचरल बोलतो.... बरेचसे नेहमीच्या बोलण्यातले शब्द असतात त्याच्या बोलण्यात...."पोट्ट्या, सॅड जोक, खचाखच...."

५. स्मिताः खुबसुरत नावाचा शो करायची आता श्रुती करते.... ११ ते २ उत्तम ब्युटी टिप्स .... रादर टिप्स पेक्षा माहीती म्हणुया पण उत्तम माहीती तिला होती.... किंवा ती शोधून सांगत असे.

६. राहुलः आता हा टोटल फिल्मी करतो २ ते ५ पण अजून तरी टोटल म्हणतो.... ट चा ठ करत नाही.

७. अनिरुद्धः हा सकाळे ७ ते ११ हॅलो पुणे... नंतरचे नाव हाय पुणे करत असे... पण आता तो रेडिओ मिरचीत नाहीये..... ही वॉझ रियली गुड

तुम्हाला काय वाटते.....रेडिओ वर अजून काय बदल व्हायला हवा? किंवा हे आर. जे. जे काही बोलतात, जसे काही बोलतात त्यावर तुम्हाला काय म्हणावेसे वाटते?confused

आपली मते, अनुभव, अपेक्षा अपेक्षित आहेत....