प्रशासक महोदय,
सप्रेम नमस्कार.......
मनोगतावर पाककृतींचे वर्गीकरण करता येणे शक्य आहे का ह्याचा विचार व्हावा ही विनंती.
पोळ्या/भाकऱ्यांचे प्रकार भात व भाताचे प्रकार भाज्या/पालेभाज्या
आमटी व रस्सा पदार्थ उसळी व कढी कोशिंबिरी व चटण्या
लोणचे/पापड व तोंडी लावण्याचे प्रकार पक्वान्ने/पुडिंग/आइसक्रीम उपवासाचे पदार्थ
न्याहरीचे/नाश्त्याचे पदार्थ सुपचे विविध प्रकार अंड्यांचे प्रकार
मटणाचे प्रकार कोंबडीचे पदार्थ माश्यांचे प्रकार
चायनीज व काँटिनेंटल सरबते व मिल्कशेक मुखशुद्धीचे प्रकार
ह्या किंवा अश्याच कुठल्याही रितीने वर्गीकरण केल्यास पाककृती सदरातून नेमका पदार्थ शोधून काढण्यास सदस्यांना सोपे जाईल असे वाटते.
पाककृती ह्या सदरावर टिचकी मारल्यावर ही अनुक्रमणिका उघडली जाईल व नेमक्या पदार्थांच्या प्रकारावर पुढे अजून टिचकी मारल्यास त्या प्रकारात मोडणारे पदार्थांची यादी लेखनकर्त्याच्या नावा सह सदस्यास दिसेल.
लेखन करतानाही हाच क्रम वापरता येईल.
सदस्यांच्या काही सूचना/सुचवण्या असल्यास कृपया चर्चा व्हावी.