फरसबीची भाजी

  • २५० ग्राम फरसबी
  • १ मध्यम कांदा
  • १/२ वाटी ओले खोबरे, कोथिंबिर
  • कढीलिंबाची ४, ५ पाने
  • १/२ चमचा उडीदडाळ
  • फोडणीचे सामान, तेल, मीठ, साखर
४५ मिनिटे
३ ते ४ जणांसाठी

कांदा चौकोनी चिरा, फरसबी चौकोनी चिरा. १ टेबलस्पून तेलात फोडणी करा. त्यात कढिलिंबाची पाने, उडदाची डाळ, लाल सुक्या मिरच्या घाला व परता. कांदा घाला व परता. खोबरे घाला व परता. झाकण ठेवून एक दोन वाफा येऊ द्या. चिरलेली फरसबी घालून परता. झाकण ठेवून शिजवा. शिजल्यावर चवीनुसार मीठ व साखर घाला. कोथिंबिरीने सजवा.

ओल्या खोबर्‍याऐवजी सुके खोबरे/डेसिकेटेड कोकोनट घालूनही ही भाजी करता येईल पण ओल्या खोबर्‍याची चव अर्थातच जास्त चांगली लागते.

म्हैसूरच्या गेस्ट हाऊसमधील आचारी