जून १९ २००८

यावरून असे तू न समजावे, की मी प्रेम तुझ्यावरती करते

यावरून असे तू न समजावे, की मी प्रेम तुझ्यावरती करते

तो:
तुझ्या रूपाची काय तारीफ करू ।
तुला सांगायलाही मी घाबरतो ॥
चुकीने न हे तू समजावे की ।
की मी प्रेम तुझ्यावरती करतो ॥ धृ ॥

ती:
माझ्या हृदयी कसकसे होते रे ।
तुझ्या रस्त्यावरून जेव्हा जाते ॥
यावरून असे तू न समजावे ।
की मी प्रेम तुझ्यावरती करते ॥ धृ ॥

तोः
(तुझ्या बोलांत गीतांची सरगम ।
तुझ्या चालीत पैंजण छुमछुमती) \-२ ॥
कुणी पाहील एक नजर, जर तुला ।
होईल खलास, तव नयनांशप्पथ \-२ ॥
मी ही अजब एक आहे खुळा ।
मरतो ना, उसासे टाकतो मी ॥ १ ॥

तीः
(माझ्या पुढती जेव्हा जेव्हा येशी तू ।
माझे मन हरखे, तन लागे स्फुरू) \-२ ॥
अभिलाषा घेई उसळी वरती ।
मन जाते कुठे, न कळे हरपून \-२ ॥
मज भासतसे प्रत्यही जैसे ।
तुझे श्वासोच्छ्वास ही घेते मी ॥ २ ॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६१६

हा शब्दशः केलेला अनुवाद नाही. शब्दांचा, अर्थाचा वेध घेणाऱ्यांना मनोरंजक वाटू शकेल.
संगीताची जाण असणाऱ्यांना अपेक्षापूर्ती होईलच असे नाही.

प्रश्न नेहमीचाच आहे. हा कुठल्या मूळ हिंदी गीताचा अनुवाद आहे?
शीर्षक अर्थातच फिरवलेले आहे.

Post to Feed

उत्तर.
तेरे हुस्न की क्या तारीफ करू
तेरे हुस्न की
सुंदर गाणे........ दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला
तेरे हुस्नकी क्या तारीफ करु
तेरे हुस्न की क्या तारीफ करू
तेरे हुस्न की क्या तारिफ करू
अगदीच सोपं आहे.
नमस्कार
तेरे हुस्न कि क्या तारीफ करू
तेरे हुस्न की क्या तारिफ करू?
तेरे हुस्नकी क्या तारीफ करू.... हेच ते गाणे
उत्तर
उत्तर घोषित करावे
उत्तरः तेरे हुस्न की क्या तारीफ करूँ
मुमुक्षू, संगीत नौशाद यांनी दिलेले आहे.
धन्यवाद.

Typing help hide