मोहनथाळ

  • १ वाटी चणाडाळीचे पीठ
  • तूप, दूध
  • केशर, खवा
  • साख्र
  • सुकामेवा
  • वेलची पूड
३० मिनिटे
२ जणांसाठी

१. प्रथम भांड्यात चणाडाळीचे पीठ, १ चमचा दूध व १ चमचा तूप एकत्र करून ठेवावे.
२. तयार मिश्रण ५ िम. नंतर चाळून घ्यावे.
३. भांड्यात १/२ वाटी तूप गरम करून त्यात चाळलेले चणाडाळीचे पीठ भाजून घ्यावे.
४. दुसर्या भांड्यात साधारण १/२ ते पाउण वाटी साखर व साखर बुडेल इतके पाणी एकत्र गरम करून त्याचा पाक तयार करावा.
५. भाजलेल्या च्णाडाळीच्या मिश्रणामध्ये खवा, सुकामेवा व साखरेचा पाक घालुन, तूप लावलेल्या ताटात थापावे व सेट करायला ठेवावे.

वड्या पाडल्यानंतर वरून केशर व सुकामेवा लावून सजवावे.

झी मराठी वरील आम्ही सारे खवय्ये