कल्पनेची उंच माझ्या झेप आहे
की पुन्हा दुर्बोध केवळ टेप आहे?
पायवाटा शोधल्या काही नव्या मी
हा महामार्गास का आक्षेप आहे?
कोवळ्या उघडून बसलो सर्व जखमा
"रक्त सुकले", त्यांस हा आक्षेप आहे!
प्रसवताना काव्य मी विव्हळू कशाला?
दोस्तहो, पहिली न माझी खेप आहे
ना विरोधाभास, ना साकी, न प्रीती
गझलप्रांती हा कसा प्रक्षेप आहे?
की पुन्हा दुर्बोध केवळ टेप आहे?
पायवाटा शोधल्या काही नव्या मी
हा महामार्गास का आक्षेप आहे?
कोवळ्या उघडून बसलो सर्व जखमा
"रक्त सुकले", त्यांस हा आक्षेप आहे!
प्रसवताना काव्य मी विव्हळू कशाला?
दोस्तहो, पहिली न माझी खेप आहे
ना विरोधाभास, ना साकी, न प्रीती
गझलप्रांती हा कसा प्रक्षेप आहे?
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
खेप
प्रे. चक्रपाणि (शुक्र., ११/०७/२००८ - ०५:१४).
वा!!
प्रे. केशवसुमार (शुक्र., ११/०७/२००८ - ०८:०१).
कविता रच, ना
प्रे. मिलिन्द२००६ (शुक्र., ११/०७/२००८ - १२:२९).
पायवाटा शोधल्या काही नव्या मी
प्रे. मानस६ (शुक्र., ११/०७/२००८ - १५:२५).
कोवळ्या...
प्रे. सतीश वाघमारे (बुध., १६/०७/२००८ - १८:१५).