जुलै १७ २००८

तुझ्या प्रेमात सजणा

तुझ्या प्रेमात सजणा

जवळ असूनही तुझ्यापासून मी खूप दूर आहे ।
राहवत ना मुळी म्हणून ऐकवते हा सल आहे ॥ प्रस्ताव ॥

तुझ्या प्रेमात सजणा, झाले मन हे किती वेल्हाळ ।
कोणी पाहो वा ना पाहो ईश्वर पाहतो आहे ॥ धृ ॥

अंतरी तुझी मूर्ती स्थापित, झाली जेव्हापासून आहे ।
शप्पथ एकही रात्र न मला, झोप लागली फार आहे ॥
हवा हवासा दर्द आहे,
निश्वासही माझा सर्द आहे,
चेहराही माझा जर्द आहे ।
न कळे कुठला रंग रंगवे तुझी पाहणे वाट ॥ १ ॥

तूच माझा जीव आहेस, तू ची आहेस प्राणही ।
मला मिळावास तू, हीच मनात एकची आसही ॥
संगतीस तू साथ हो,
काही मना-मनाची बात हो,
गुजगोष्टी दिलखुलास हो ।
गाणीही गावी प्रेमाची, छेडावी मनची तार ॥ २ ॥

ओवाळीन मी जीव तुझ्यावर, भग्न हृदय हे सांध तू ।
नजरांमधला दूर दुरावा नजरेने कर पार तू ॥
दुर्लभदर्शन आज आहेस?
का भेटीलाही महाग आहेस?
मनही दुःखातच आज आहे? ।
अशीच क्रंदत राहीन, जोवर दर्शन ना होणार ॥ ३ ॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७०८

शकील यांच्या गर्भश्रीमंत रचनेस, नौशाद यांचे लाघवी संगीत लाभले असून,
लताजींच्या आवाजाने बहार आणली आहे.
त्यामुळे अनुवाद, मूळ रचनेच्या लोकप्रियतेच्या आसपासही पोहोचणार नाही.

मात्र, अनुवादावरून गाणे ओळखता आले तरी पुरेसे आहे. मग, ओळखा तर मूळ हिंदी गीत.

Post to Feed

उत्तर
तेरे प्यारमें दिलदार
मस्त एकदम छान
फार सुंदर
हाल-ए-इजार
मनाची त्रस्त अवस्था
माझ्या अनुवादांवर अशीच नजर असू द्या.
पायजाम्याची अवस्था
छे! छे!! पायजम्याची अवस्था काय करायची आहे?
उत्तर
तेरे प्यारमें दिलदार, जो है ..
पास रहते हुए भी तुझसे
उत्तर घोषित करावे
उत्तरः तेरे प्यार में दिलदार

Typing help hide