जुलै
१३
२००८
हा पाऊस असा कसा झालाय हल्ली?
कधीकधी हा जातो महिना-महिना नजरेआड
कारावासाची सजा झालेल्या कैद्यासारखा अदृश्य
कुठेतरी गजाआड?
..
तर कधी
येतो फक्त सायंकाळी
दबकत दबकत, ओशाळवाणा
पॅरोलवर सुटलेला पण रोज
पोलीसठाण्यावर हजेरी द्यायला जावे लागावे तसा
नाईलाजाने नियमित?
..
अन कधी
त्याचा वावर असतो
तुरुंगातून पळालेल्या कैद्यासारखा
फक्त रात्री अंधारात..
जाणवतात त्या चोरपावली हालचाली
कुणाला तरी अंधारात एकटं गाठून
लुटण्यासाठी असाव्या तशा?
..
त्या जुन्या खट्याळ, सदवर्तनी, दिवसा उजेडी, उघड उघड येणाऱ्या पावसाचे
आता काय झाले?
(जयन्ता५२)
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
वा !
प्रे. चैतन्य दीक्षित (रवि., १३/०७/२००८ - १७:१०).
पॅरोल
प्रे. चक्रपाणि (रवि., १३/०७/२००८ - १८:१६).
बेमालूम सांगड...!
प्रे. प्रदीप कुलकर्णी (रवि., १३/०७/२००८ - १८:१८).
सुरेख
प्रे. चक्रधर१ (सोम., १४/०७/२००८ - ०५:५९).
उपमा..
प्रे. मानस६ (बुध., १६/०७/२००८ - ०३:३९).
भाषेची ताकद
प्रे. शिरीन कुलकर्णी (बुध., १६/०७/२००८ - १३:२६).
उत्तम !
प्रे. सतिश वाघमारे (बुध., १६/०७/२००८ - १८:४१).