वांग्याचे भरीत

  • १ मोठं काळं वांगं, १ कांदा, १ मोठा टोमॅटो, ३-४ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर,
  • १ टिस्पून जिरेपूड, पाव टिस्पून मिरपूड, अर्धा टिस्पून लाल तिखट, अर्धा टिस्पून गरम मसाला. पाव वाटी किसलेले पनीर.
३० मिनिटे
२-३ जणांसाठी

वांगे भाजून साल काढून कुस्करून घ्यावे. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. कांदा+हिरव्या मिरच्या मिक्सरमधून वाटून घ्याव्यात. कढईत २ टेबलस्पून तूप तापवून त्यात कांदा+मिरची वाटण परतावे. मग टोमॅटो घालून परतावा. कडेने तूप सुटू लागले की मग वांगं, इतर मसाले व मीठ घालून नीट परतावे. भरीत कोरडे व्हायला लागले की त्यात किसलेले पनीर घालून १-२ मिनिटे परतून उतरवावे. वरून चिरलेली कोथिंबीर पेरावी.

तूपाऐवजी तेल वापरले तरी चालेल. पण तूपाचा स्वाद अधिक छान येतो.

मैत्रीण