जुलै ३१ २००८

माझ्या सजणामधे काय कमी

माझ्या सजणामध्ये काय कमी

पहिलीः
माझ्या सजणामध्ये काय कमी, काय कमी
माझ्या सजणामध्ये काय कमी
देखणा तो तर लाखांतही
देखणा तो तर लाखांतही, आहे सही

दुसरीः
माझ्या सजणामध्ये काय कमी, काय कमी
माझ्या सजणामध्ये काय कमी
भोळा चेहरा, लकब लाघवी
भोळा चेहरा, लकब लाघवी, लाघवी ॥ धृ ॥

पहिलीः
आ ऽ ऽ
प्रियकर माझा एक चंद्रमा
रूपसौंदर्ये दिपवित असा

दुसरीः ओ ऽ ऽ

पहिलीः
आकाशीचा आहे तो देवदूत
रूप मनुष्याचे धारण करून

दुसरीः ओ ऽ ऽ

पहिलीः
स्वर्गदुर्लभ छबी चंद्रसी
स्वर्गदुर्लभ छबी चंद्रसी, चंद्रसी ॥ १ ॥

दुसरीः
आ ऽ ऽ
चंद्र, तारे तळपो, वा नक्षत्रे
प्रिय सर्वांत प्रियतम असे

पहिलीः आ ऽ ऽ

दुसरीः
तेजोवलयी त्या सामर्थ्य हे
भान ईश्वरशपथ हरपते

पहिलीः आ ऽ ऽ

दुसरीः
त्याला पाहशील जर तू कुठे
त्याला पाहशील जर तू कुठे, तू कुठे ॥ २ ॥

पहिलीः
प्रियतम ऐसा, जीवच की प्राण
छाती निधडी, हृदय पुष्पवान

दुसरीः
दिलवर माझा आहे इतका युवा
ऐन फुलला बहारीत मळा

पहिलीः
चाल लवचिक आहे, तनू खेळकर
गेंद झुलताती जणू फांदीवर

दुसरीः
त्याच्या शब्दांत ऐसे गुंजन
काच काचेवर वाजे छनन
ऐट चित्ताकर्षक आहे त्याची

दोघीः
भोळा चेहरा, लकब लाघवी, लाघवी
माझ्या सजणामध्ये काय कमी, काय कमी
माझ्या सजणामध्ये काय कमी ॥ ३ ॥ 

दुसरीः
कहाण्यातून तुझ्या, हे सये
छटा माझ्या कथांची दिसे

पहिलीः
कथानकं जुळती आहेत ही
देवा, दोन्ही पतंगांचीही

दोघीः पतंगांचीही

दोघीः
काय ज्योतही एकच तर नाही
देखणा तो तर लाखांतही, आहे सही
माझ्या सजणामध्ये काय कमी, काय कमी
माझ्या सजणामध्ये काय कमी ॥ ४ ॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७१२

काय सजणात माझ्या कमी?
असा प्रश्न विचारत दोघीजणी एकमेकींच्या प्रियतमाच्या गुजगोष्टी करत असतात.
एकापेक्षा एक सरस उपमांनी त्या स्वतःच्या प्रियतमाचे गुण गातात.
शेवटी त्या वर्णनांतूनच त्याना परस्परांचा प्रियतम एकच असल्याचा काव्यमय उलगडा होतो.

मूळ हिंदी गीत ओळखा. ते फारसे अवघड नाही.

चित्रपटात, एवढ्या एवंगुणविशिष्ट प्रियतमाची भूमिका कुणी केली आहे?

Post to Feed

नमस्कार
मेरे मेहबूबमें क्या नही
उत्तर
मेरे मेहबूब मे क्या नही?
शुभादेवी, तुम्ही म्हणता ते अगदी खरयं हो!
मेरे मेहबूबमें क्या नहीं, क्या नहीं?
जाऊ द्या हो, त्याला माफ करून टाका!
मेरे मेहबुब मे क्या नही
उत्तर घोषित करावे
उत्तरः "मेरे मेहबूबमें क्या नही, क्या नही" आणि राजेंद्रकुमार
चुकीची दुरुस्ती ...

Typing help hide