नोव्हेंबर २००८

रव्याच्या वड्या

जिन्नस

  • १ वाटी बारीक रवा
  • १ वाटी साजूक तूप
  • ३ वाट्या दूध
  • ३. ५ ते ४ वाट्या साखर
  • वेलचीपूड, केशर
  • १/२ वाटी बदाम किवा काजू पूड (ऐच्छिक)

मार्गदर्शन

रवा थोडा भाजून घेणे. थंड झाला की बाकी सर्व जिन्नस त्यात मिसळणे. एका कढईत सर्व मिश्रण आटवत ठेवणे. मिश्रण उडते, त्यामुळे ढवळताना काळजी घेणे. घट्ट झाले की लाटून किवा थापून वड्या पाडणे.

टीपा

वड्यांचे चित्र

माहितीचा स्रोत

.


खरे तर
अरे बापरे..
वाह रे माज्या मर्दा!!

Typing help hide