कांद्याच्या हिरव्या पुऱ्या

  • प्रत्येकी एक वाटी तांदळाची पिठी, ज्वारीचे पीठ आणि मैदा, दिड वाटी बारीक चिरलेला पालक,
  • एक वाटी किसलेला कांदा, दोन टीस्पून आलं-लसूण पेस्ट, दोन टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट, चवीपूरते मीठ, साखर, तळण्यासाठी तेल.
४५ मिनिटे
२-३ जणांसाठी

तिन्ही पिठे एकत्र करून त्यात पालक, कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, मीठ, साखर घालून पाव वाटी गरम तेलाचे मोहन घालावे. जरूरीपुरते गरम पाणी घालून घट्ट गोळा भिजवावा. अर्ध्या तासानंतर पुऱ्या लाटून तळाव्यात. या पुऱ्याना सुरेख कांदा भज्यांची चव येते.

(मूळ शीर्षक : ग्रीन ओनियन पुरी - प्रशासक)

इंटरनेट