मसालेदार अचारी पराठा

  • ३-४ वाट्या कणीक, ६ बटाटे,
  • पंजाबी लोणच्याच्या मसाल्याचे पदार्थ प्रत्येकी पाव टिस्पून (मोहरी, जिरं, मेथी, बडीशेप, धने, हिंग, ओवा),
  • हळद, चवीनुसार तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल.
४५ मिनिटे
२-३ जणांसाठी

नेहमीप्रमाणे कणीक भिजवून घ्यावी. बटाटे उकडून किसून घ्यावेत. पंजाबी लोणच्याच्या मसाल्याच्या पदार्थांची थोडे भाजून पूड करावी. थोडेसे तेल तापवून त्यात हळद, मसाल्यांची पूड घालावी. लगेच किसलेले बटाटे, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून जरा परतावे. गार झाल्यावर कणकेच्या पारीत सारण भरून हलक्या हाताने पराठे लाटून तेल सोडून भाजावेत.

नाहीत

मैत्रीण