पुदिन्याची चटणी

  • पुदिन्याची पाने, पंढरपुरी डाळे १०० ग्रॅम, लाल मिरची, कोरडे खोबरे
  • २ टोमॅटो, जिरे, हिंग, मोहरी, तेल, २ मोठे कांदे, थोडी कोथिंबिर, मीठ
३० मिनिटे

२ कांदे उभे चिरून घ्यावेत. टोमॅटो चिरून घ्यावा. कढईत थोडे तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो घालावा. पुदिन्याची पाने, पंढरपुरी डाळे, लाल मिरची, कोरड्या खोबऱ्याचे तुकडे घालावेत. चवीनुसार मीठ घालावे. थोडा वेळ परतावे. नंतर हे मिश्रण गार झाले की मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. सर्वात शेवटी ह्या चटणीवर तेल, जिरे, हिंगाची फोडणी घालावी. इडली, डोसा, मेदुवड्याबरोबर छान लागते.

नाहीत

साउथ इंडियन मैत्रिण