चंद्र आहे बांधलेला चांदणीला
यौवनाच्या रूपसुंदर दावणीला
लाजली नाही सखी मी बोलताना
लाजला येऊन मुद्दा ऐरणीला
काय सांगू कहर हा झाला कशाने
ती जरा लववून गेली पापणीला
नाक अपरे, केव्हढा अन् राग त्यावर
शोभतो तोरा खरा छोट्या चणीला
काळकूटाने नको माखूस डोळे
विभ्रमी चाळा पुरेसा जीवणीला
खोड पाण्याची जुनी 'विक्षिप्त' आहे
जात आढ्याचे अखेरी वळचणीला
यौवनाच्या रूपसुंदर दावणीला
लाजली नाही सखी मी बोलताना
लाजला येऊन मुद्दा ऐरणीला
काय सांगू कहर हा झाला कशाने
ती जरा लववून गेली पापणीला
नाक अपरे, केव्हढा अन् राग त्यावर
शोभतो तोरा खरा छोट्या चणीला
काळकूटाने नको माखूस डोळे
विभ्रमी चाळा पुरेसा जीवणीला
खोड पाण्याची जुनी 'विक्षिप्त' आहे
जात आढ्याचे अखेरी वळचणीला
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
वा...!!!
प्रे. चक्रधर१ (गुरु., १४/०८/२००८ - १३:४९).
छान
प्रे. चक्रपाणि (गुरु., १४/०८/२००८ - २०:३४).
मस्त
प्रे. पुलस्ति (शुक्र., १५/०८/२००८ - १४:३१).
छानच !
प्रे. सतिश वाघमारे (शुक्र., १५/०८/२००८ - १९:१२).
मुद्दा
प्रे. योगेश वैद्य (रवि., १७/०८/२००८ - ०१:२८).