जिलेबी

  • ३ वाटी मैदा
  • १ वाटी उडीद डाळ
  • १ कप साखर
  • १ चिमुट केशर
  • २ चिमटी वेलदोडा पुड
  • २ चमचे लिंबाचा रस
दीड तास
खाणार्यावर अवलंबून

उडीद डाळ ४-५ तास भिजवून मिक्सरमधून बारीक करून घ्यावी, मग त्यात मैदा मिसळवा.
पिठात एक पण गुठळी नको म्हणून पिठातून ब्लेंडर फिरवून घ्यावे. इडली पिठासारखे भिजवून ६-७ तास उबेला ठेवावे.
आता सॉसच्या बाटलीत पीठ भरून गरम तेलात जिलेब्या घालाव्यात आणि थोड्या ब्राऊन रंगावर तळून लगेच पाकात टाकाव्यात. ५ मिनीटांनी काढून घ्याव्यात.
पाकाची कृती:
१ कप साखरेत १/२ कप पाणी, केशर, लिंबाचा रस आणि वेलदोडा पुड घालून उकळी आणावी आणि गस बंद करावा.

गरमा गरम खाव्यात :)

आई