पाककलानिपुण मनोगतींना आवाहन.

संपला एकदा श्रावण.

महिनाभर नाइलाजाने पाळावा लागलेला श्रावण महिना आज संपणार. उद्या काय करायचे जेवायला याचा विचार करताना एकदम वाटले की सगळ्या पाककलानिपुण मनोगतीन्ना आवाहन करावे की आता रंगतदार चमचमीत झणझणीत पाककृती येउद्यात. पालेभाज्या, उपवासाचे पदार्थ खाउन वैताग आलाय नुसता.

तेव्हा मंडळी, आता मटण, कोंबडी, खिमा, भेजा, मासे अशा विषयान्मध्ये पारंगत असलेल्यानी उशीर न करता आपापल्या उंदरान्वर टिचक्या मारा आणि करा लिहायला सुरुवात.

हे लिहीताना सुध्धा मुखरसभरीत झालेला

मनोगती

इचलकरन्जीकर.