गाडीच्या रिव्हर्स हॉर्नवर बंदी घालता येईल का?

मी कर्वेनगर ला राहतो.

माझ्या इमारती मध्ये बऱ्याच cars आहेत. गाडीचे मालक आणि चालक कधी ही रात्री अपरात्री येतात. आणि गाडी रिव्हर्स मध्ये घेऊन लावतात. मी रहातो पहिल्या मजल्यावर. माझ्या घरात २ लहान बाळे आहेत. १० महिन्याची. त्यामुळे ती दोघेही झोपेतून दचकून जागी होतात.

ह्या सगळया लोकाना तोंडी सांगून झाले आहे. कायद्या मध्ये अशी काही तरतुद आहे का त्याना समजेल अशा भाषेत सांगायची.