जया बच्चन ची मुक्ताफळे

जया बच्चन हीने नको ते वक्तव्य करून परत एकदा स्वतःचा महाराष्ट्र व मराठी द्वेष्ठेपणा चव्हाट्यावर आणला आहे.
राज ठाकरे ह्यांनी "गुड्डी बुढ्ढी हो गयी फिर भी अक्कल नही आयी" अशी शेलकी प्रतिक्रिया देऊन व बच्चन कुटूंबीयांवर बहिष्कार टाकल्याचे घोषीत करून ह्या संतापाला वाट दाखवली हे बरेच झाले.
अभिषेक बच्चनच्या "द्रोणा" ह्या बहलने बनवलेल्या चित्रपटाच्या "प्रमोशनल कँपेन" च्या कार्यक्रमात तीने स्वतःच्या अकलेचे प्रदर्शन केले. मी यु. पी वाली आहे व म्हणून हिंदीतच बोलणार तेव्हा महाराष्ट्रातल्या (मुंबईतल्या) लोकांनी मला माफ करा असली दर्पोक्ती करून मग नंतर रान पेटले आहे हे बघताच फुंकर मारून आग विझवण्याचा आता प्रयत्न करते आहे.

ह्या बच्चन कुटूंबाला चळ लागलाय की काय ते समजेनासे झालेय. जया बच्चन तर चळल्यागतच वागते आहे.
सार्वजनीक जीवनांत ज्या अमरसींग बरोबर मांडीला मांडी लावून बसले, खांद्याला खांदे लावून फिरले व गळ्यात गळे घालून मिरवले त्याच अमरसींग ने सत्ते साठी मॅडम शी घरोबा करून ह्यांचा पोपट केला. ह्यावरून आपली लायकी फक्त चित्रपटाच्या पडद्यावर नाचण्याची असून आपली सामाजीक किंमत शुन्य आहे हे ह्या कुटूंबाला आतापर्यंत कळले असावे असा एक समज होता पण प्रत्येक ठिकाणी स्वतःचे हसे करवून घेण्याची सवय ह्या बच्चन कुटूंबाला जडली असावी. मराठी माणसाला सतत  डिवचण्याची  खुमखूमी ह्या बाईत असल्यास ही रग जिरवायलाच हवी. महाराष्ट्र सरकारनेही दरवेळी राज ठाकरेंचा ढोल बनवून पिटवण्याऐवजी असल्या आगलाव्या मंडळींना काबूत आणण्यासाठी पावले उचलायला हवीत.

"थेरडीची अर्धी लाकडे मसणात पोहचली तरी तिचा  म्हातारचळ गेला नाही" असेच आता म्हणावे लागेल.

जया बच्चन हीच्या मराठी विरोधी कृतीचा येथे निषेध नोंदवण्याने हा निषेध तेथे पोहचेल असल्या दुधखुळ्या समजूतीत मी नाही व म्हणूनच अमिताभच्या बिग-अड्डा ह्या ब्लॉगवर त्याचा निषेध नोंदवून येथे हा लेख टाकत आहे. स्वाभिमानी मराठी मंडळींनीही तेथे निषेध नोंदवण्यास हरकत नाही !
संबंधीत बातमी खालील दुव्यावर वाचा.

दुवा क्र. १