पालक भजी

  • पालक पाने
  • हरबरा डाळीचे पीठ
  • तांदुळाचे पीठ
  • लाल तिखट, हळद, हिंग पावडर, मीठ
  • भजी तळण्यासाठी तेल
३० मिनिटे
जितकी पाने तितकी भजी

पालकाची निवडक पाने पाण्याने धुवून ती अलगद हाताने पुसून घ्या. हरबरा डाळीच्या पीठामध्ये थोडेसे तांदुळाचे पीठ घाला. त्यात थोडेसे लाल तिखट, हळद, हिंग पावडर व चवीप्रमाणे मीठ घालून पीठ भिजवा. हे पीठ पातळ असू देत. कढईत पुरेसे तेल तापत ठेवा. ते तापले की एकेक पालकाचे पान डाळीच्या पीठामध्ये बुडवून ती अलगद तेलामध्ये सोडा व भजी तळा. ही भजी कुरकुरीत व हलकीफुलकी होतात.

आपल्याकडे जर पाहुणे येणार असतील तर जेवणामध्ये ही भजी जरूर करा. दिसायला आकर्षक दिसतात.

स्वानुभव