पिठीच्या करंज्या

  • रवा व मैदा १-१ वाटी, कणीक २ वाट्या
  • पिठीसाखर पावणेदोन वाट्या, वेलची पूड , चारोळी,, काजू पूड
  • सुक्या खोबर्याचा कीस - १ टे स्पून- मंद भाजून
  • साजूक तूप - मोहनासाठी, रिफाईंड तेल- तळण्यासाठी, दूध- १ कप
३० मिनिटे
४-५

प्रथम कणीक साजूक तुपावर (जरा सढळ हाताने तूप घालून) लाल रंगावर (व मंदाग्नीवर) खरपूस भाजून घ्यावी.
गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेल्दोडे पूड, खोबरे कीस इ नीट मिसळून घ्यावे.
हे सारण तयार झाले.

बारीक रवा व मैदा एकत्र चाळून घ्यावा. त्यात चिमूटभर मीठ व ४ टी स्पून गरम तूपाचे मोहन घालून दुधात भिजवून घ्यावे. (हे मिश्रण जरा सैलसर ठेवावे कारण रवा दूध शोषून घेत असल्याने लगेच कोरडे पडते.) १ तास मुरू द्यावे.
मग गोळा बराच मळून घेऊन मऊ करावा. हवा असल्यास दुधाचा हात घ्यावा.

या पांढर्या शुभ्र गोळ्याच्या लहान लहान पातळ पुर्या लाटून त्यात उपरोक्त सारण भरून मंदाग्नी वर रिफाईंड तेलात तळून काढाव्यात. शक्यतो लाल तळून देऊ नये... पांढर्याच काढाव्यात.....
 

ओले खोबरे नसल्याने बरेच दिवस टिकतात.

सासूबाई